जिहादी राहात असलेल्या परिसरात नेहमीच हल्ले ; आ. जगतापांचा दावा

अहिल्यानगर शहरात जिहादी वृत्तीचे लोक ज्या-ज्या भागात राहतात, त्या-त्या भागात मनपा कर्मचार्‍यांवर हल्ल्याचे प्रकार नेहमी होतात, असा खळबळजनक दावा शहराचे आ.संग्राम जगताप यांनी केला आहे. मनपा कर्मचारी धीरज राजपूत याच्यावर हल्ला करणारांना पोलिसांनी तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी दुपारी धीरज राजपूत या मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचार्‍यांवर टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. त्याची प्रकृती चिंताजनक असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी आ. जगताप म्हणाले, 2023 मध्ये जुन्या मनपाजवळ वीज लाईनचे काम करणार्‍या मनपा कर्मचार्‍यांना मारहाण झाली होती व त्याचा गुन्हा कोतवाली पोलिसात दाखलही आहे.

अशा घटना जिहादी लोक ज्याज्या भागात राहतात, त्या भागात वारंवार घडतात. कचरा सफाई करणारांना धमक्या, पाणी सोडणार्‍या व्हॉल्व्हमनच्या पाणी सोडण्याच्या लोखंडी चाव्या काढून घेणे वा अन्य प्रकार होतात. मात्र, एखाद्यावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना पहिल्यांदा घडली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles