महाराष्ट्रात खळबळ ,भाजप आमदाराला गोळ्या घाल, पैसे देतो; चालकाला २ जणांनी दिली ऑफर

तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो, अशी ऑफ असे म्हणत भाजप आमदारांच्या वाहन चालकांना ऑफर दिल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधून समोर आली आहे. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजप आमदाराला गोळ्या मारण्यासाठी ऑफर दिल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
भाजप आमदाराला गोळ्या मार, असे आमिष चालकाला दिल्याप्रकरणी सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे अक्कलकोटचे विद्यामान आमदार आहेत.रू केला आहे.

भाजप आमदाराला गोळ्या मार, असे आमिष चालकाला दिल्याप्रकरणी सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे अक्कलकोटचे विद्यामान आमदार आहेत.

वाहन चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी गाडीजवळ थांबलेले चालक आनंद सुरवसे यांच्याजवळ आरोपी श्रीशैल हुळळी आणि फुलारी हे दोघे आले. तुला आम्ही पैसे देतो तुझ्या आमदार दादाला गोळया घाल, पुढचं आम्ही बघून घेऊन यात तुझा फायदा आहे असे सांगत आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles