Friday, February 20, 2026

बीडमध्ये संतोष देशमुखांनंतर पवनचक्की वादातून पुन्हा गोळीबार, एकाचा मृत्यू

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीमुळे झाली होती त्यावरूनच पुन्हा राडा झाला आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. सुरक्षारक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्लँटच्या परिसरात हा गोळीबार झाला. पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोरटे आले होते. या चोरट्यांवर पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली गुन्ह्याची ही आणखी एक गंभीर घटना आहे. लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे आणि याच ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य ठेवण्याचा यार्ड आहे. मात्र या पवनचक्कीच्या यार्डमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या अगोदर देखील चोरीच्या अनेक घटना याठिकाणी घडल्या आहेत. सततच्या चोरीच्या घटनांमुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्यात आले होते.

गुरूवारी मध्यरात्री लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याच्या यार्डमध्ये काही जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात चोरट्याला गोळी लागली होती. गंभीर जखमी झालेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला जात आहे. सुरक्षारक्षक रूप सिंग टाकला पोलिसांनी अटक केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles