पैसे परत देण्याच्या बहाण्याने तरुणाकडून अत्याचार; अहिल्यानगरमधील घटना

पैसे परत देण्याच्या बहाण्याने तरुणाकडून अत्याचार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
​अहिल्यानगर : उसने दिलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने १९ वर्षीय विवाहितेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय रघुनाथ ठोकळ (रा. जवखेड, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची शेवगाव तालुक्यातील असून सध्या नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरात राहते. पीडितेने आरोपी दत्तात्रय ठोकळ याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला माळीवाडा बस स्थानक येथे भेटण्यासाठी बोलावले.

​त्यानंतर आरोपीने पीडितेला स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून अहिल्यानगर ते पुणे रस्त्यावरील चास शिवारातील एका लॉजवर नेले. तेथे तिचे हात-पाय बांधून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या पतीला मारून टाकीन, अशी धमकीही आरोपीने दिली. ​याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय ठोकळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles