onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -13-08–2026 एकुण कांदा गोणी -61,317
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 3000 ते 3500
2.नंबर= 2100 ते 3000
3 नंबर= 1300 ते 2100

4 नंबर= 700 ते 1300

————————————————————————————————————————————————–
बोल्हेगावात तिरट जुगारावर पोलिसांचा छापा
सहा जण पकडले 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर -स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या हारजीतीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत सहा मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 56 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी 3.55 वाजता चोभे कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव येथील एका घराच्या बाहेरील पडवीमध्ये काही जण तिरट नावाचा हारजीतीचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पंचांना सोबत घेतले आणि नमूद ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी पोलिसांना पडवीमध्ये सहा जण जुगार खेळताना आढळून आले.

त्यांची नावे भाऊसाहेब राफायल बोर्डे (36), जुबेर शौकत पठाण (26), अभिषेक उर्फ पप्पू मोहन देठे (29), दीपक बाळकृष्ण शिरसाठ (34), सुशील काशिनाथ वाव्हळ (30) आणि प्रदीप प्रभाकर कदम (55, सर्व रा. बोल्हेगाव) अशी आहेत. पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून रोख रकमेसह विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मिळून आले. ही कारवाई निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संदीप पवार, राहुल व्दारके, रमीझराजा आत्तार, अमृत आढाव आणि भगवान थोरात यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles