नगर शहरात नगरसेवकाला थेट दक्षिण आफ्रिकेतून धमकी; इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून बदनामीचा इशारा

नगरसेवकाला धमकी; इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून बदनामीचा इशारा, गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: नगरसेवक शम्स समीर खान ऊर्फ शम्स समीउल्ला खान (वय ३०, रा. गोविंदपुरा) यांना इंस्टाग्रामवर मेसेज करून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २४ तासांत वक्तव्य न केल्यास इंस्टाग्रामवर व्हिडिओ प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शम्स खान हे भिंगार परिसरातील गोविंदपुरा येथील ७ नंबर बंगल्यात राहतात. ११ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांना ‘er.akib_sayyes-078’ या इंस्टाग्राम आयडीवरून मेसेज आला. आरोपी आकीब असीफ सय्यद (वय ३०, मूळ रा. मुकुंदनगर, सध्या रा. दक्षिण आफ्रिका) याने हा मेसेज पाठवला होता. ‘येत्या २४ तासांत काहीतरी स्टेटमेंट दे, नाहीतर तुझा व्हिडिओ टाकून तुझी इंस्टाग्रामवर बदनामी करेन,’ अशी धमकी आरोपीने दिली.
​या धमक्यांमुळे नगरसेवक शम्स खान यांनी १२ ऑगस्ट रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस हवालदार रामनाथ डोळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. ​सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अहमद इनामदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परदेशात बसून दिलेल्या या धमकीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सायबर यंत्रणेच्या मदतीने तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles