नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या बादल यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या माता साहेब गुरुद्वारा परिसरात हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडच्या गुरुद्वाराच्या परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेला एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. बादल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी बादल यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली आहे. या घटनेत आरोपीला तात्काळ अटक केली असून कोणत्या उद्देशाने हा हल्ला झाला, याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.सुखबीर सिंह बादल यांची प्रकृती चांगली आहे, असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती वकील आहे. आरोपी जसपालसिंग याचं वय 62 वर्ष आहे. तो मूळचा पुणे येथील आहे. जसपालसिंग पुणे न्यायालयात वकील होता. मागील 2 वर्षांपासून नांदेड जवळील मुगट येथील मातासाब गुरुद्वारात तो सेवा करत आहे. आज सुखबीरसिंग बादल मातासाब गुरुद्वारातुन दर्शन बाहेर पडताच जसपालसिंग यानं हल्ला केला.जसपालसिंग याला जागेवरूनच अटक करण्यात आलं असून पोलीस चौकशी सुरु आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरानं नेमक्या उद्देशानं हल्ला केला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली, यावेळी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली. मिळालेल्या माहितीनुसार सुखबिरसिंह बादल यांची प्रकृती स्थिर आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles