पैसे न दिल्यास पत्नीची नोकरी घालवू ; आरटीओ अधिकाऱ्याच्या पतीकडे खंडणीची मागणी,पाथर्डी तालुक्यातील घटना

पाथर्डी-डंपरवरील कारवाईच्या कारणावरून महिला सहायक मोटार वाहन निरीक्षकाच्या पतीला अडीच लाख रुपये देण्यासाठी धमकावून, पैसे न दिल्यास पत्नीची नोकरी घालविण्याची तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल रामदास गर्जे यांनी सुधीर शिरसाठ, किसन महादेव आव्हाड, भाऊ आरगडे, बबलू कांबळे, राहुल सानप यांच्यासह अनोळखी पाच ते सहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 27 मार्च रोजी बोधेगाव येथे विनानंबरचा ओव्हरलोड डंपर आढळल्याने वायुवेग (आरटीओ) पथकाने कारवाई केली होती.

फिर्यादीनूसार, डंपर सुधीर शिरसाठ यांचा असल्याचे सांगत कारवाई मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. 28 एप्रिल रोजी शिरसाठ व किसन आव्हाड यांनी कारेगाव येथील पेट्रोल पंपावर गर्जे यांना बोलावून अडीच लाख रुपयांची मागणी करत पत्नीची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 3 मे रोजी शिरसाठवाडी रोडवर गर्जे यांना अडवून मारहाण करण्यात आली. धारदार हत्याराने डोक्यात वार करून जखमी केले तसेच तक्रार केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत गावठी पिस्तूल दाखवल्याचा आरोप आहे. 12 ऑगस्ट रोजी खरवंडीहून घरी जात असताना जॉगिंग पार्कसमोर विनानंबरच्या काळ्या स्कॉर्पिओ व अल्टो कारमधून आलेल्या संशयितांनी गर्जे यांची कार अडवली.

अडीच लाख रुपयांची मागणी करत पत्नीची नोकरी घालविण्याची धमकी दिली. एका अनोळखी व्यक्तीने गळ्याला चाकू लावला, तर सुधीर शिरसाठ यांनी गावठी पिस्तूल रोखले. त्यानंतर गर्जे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. प्रकार कोणाला सांगितल्यास गर्जे दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून, पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles