शरद पवारांची राष्ट्रवादी एऩडीएसोबत जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

शरद पवारांची राष्ट्रवादी एऩडीएसोबत जाणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चेला येत येतोय. त्याला कारण होतं.. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतलेली भेट… तसचं पवारांच्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची घेतलेली भेटही एनडीएतील प्रवेशाच्या चर्चांना कारणीभूत ठरत होती…मात्र आता स्वत: शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत पवार नेमकं काय म्हणाले

शरद पवार काय म्हणाले?

मुंबईत जिल्हाध्यक्षांची 2 दिवसीय बैठक पार पडली

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा या बैठकीत पवारांनी आढावा घेतला

बैठकीत पक्ष NDAसोबत जाणार का? असा सवाल काही जिल्हाध्यक्षांनी पवारांना केला

मात्र आपण विरोधातच आहोत, कुणीही संभ्रमात राहू नये असं म्हणत पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय…

दरम्यान पवारांनी केलेल्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट प्रतिक्रिया देण्यास टाळलयं..दुसरीकडे पवारांच्या NDA प्रवेशाबद्दल भाजप संभ्रम निर्माण करत असल्याचं आणि पवार मविआसोबतच राहणार असल्याचा दावा ठाकरेसेनेच्या राऊतांनी केलाय…मात्र पवार याचा राजकीय इतिहास पाहता ते पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला सांगतात, असं म्हणत दरेकरांनी पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय…

मुळात जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना आता ब्रेक लागलाय…. ज्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रमही पवारांच्या या भूमिकेनंतर दूर झाल्याचं समजतंय…मात्र राजकारणात काहीही शक्य असतं आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी गेल्या काही वर्षांत दाखवून दिलंय. त्यात पवारांचं राजकारण समजण्याएवढं सरळही नसतं. त्यामुळे पवारांचे राजकीय डावपेच सहज समजून आले तर ते पवार कसले….

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles