ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत झालेल्या गदारोळातून एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ग्रामसभेत काही नागरिकांनी केलेल्या हुल्लडबाजी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रयत्नामुळे आलेल्या तीव्र मानसिक तणावातून ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना 16 ऑगस्ट रोजी घडली असून, या प्रकरणी रात्री उशिरा 6 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरे गावात 16 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान काही ग्रामस्थांनी अचानक आक्रमक होत सरपंच आणि ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना टार्गेट केले. काही तरुणांनी पाटील यांना जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ग्रामसेवक पी. एन. पाटील हे प्रचंड घाबरले आणि त्यांना मोठा मानसिक तणाव येऊन अस्वस्थ वाटू लागले.

तब्येत बिघडल्याने तणावाखाली असलेल्या पाटील यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून स्वतःच्या दुचाकीने पारोळा येथील सिव्हिल रुग्णालयाकडे जाणे पसंत केले. मात्र, तरीही काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. या पाठलागामुळे पाटील यांनी अत्यंत तीव्र धसका घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.ग्रामसेवक पी. एन. पाटील यांच्या मृत्यूची बातमी पसरताच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. पारोळा, जळगाव, अमळनेर, भडगाव आणि पाचोरा येथील ग्रामसेवक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन केले. मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनाला ‘करणी सेने’च्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवत तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.6 संशयित आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles