सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज शनिवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहेबुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २४ मे २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,८५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,७७९ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९८,२३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९८२ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९६,६८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,६२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,६८० रुपये आहे.


