कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं ! मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेची बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या अनेक दिवसांपासून समता परिषदेची बैठक झाली नव्हती, आज राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत संवाद केला. समता परिषदेच्या सर्व कार्यक्रमांची उजळणी केल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावरही त्यांनी भूमिका मांडली, तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेलं वक्तव्य अमान्य असल्याचे बोलून दाखवले.

कोण म्हणते ओबीसीचे आरक्षण संपले? जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला. तसेच, महात्मा फुले यांचे वांगमय भाषण यावर आम्ही मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर आम्ही काय बोलणार, सरकार त्यावर बोलतील आणि निर्णय घेतील, असे भुजबळ यांनी म्हटले. आम्ही जात जनगणना मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जाती त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. प्रत्येक राज्यात ओबीसींचे नाव त्यावर आम्ही मागणी केली तो शोध घेतला जात आहे. माळी समाज हा महाराष्ट्रात आहे, जेव्हा लढायचं तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आम्ही राज्यात फिरलो. छगन भुजबळ हा काय घाबरला? असा सवाल नाही, असे म्हणत गरज होती तेव्हा आपण लढल्याचं भुजबळ यांनी म्हटलं. तर, सरकार आमच्यासोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढत आहोत, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles