छत्रपती संभाजीनग येथील वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी घेतली, त्याला वाचवताना वडिलांचाही तोल गेला आणि त्यांना डोंगरावरून कोसळताना पाहून आईने पाठोपाठ उडी घेतली. तिघेही उंच कड्यावरून खोल खाणीमध्ये पडले. खडकावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणाला आयफोनचा हप्ता भरणं परडवत नसल्याने सदर प्रकार घडल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता या चांदगुडे कुटुंबीयांच्या नातेवाईकांकडूनच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.टीव्ही ९ मराठीशी बोलताना कुणाल चांदगुडेच्या मावशीच्या पतींनी आयफोनचा दावा फेटाळून लावला. कुणालकडे दोन आयफोन होते, हे कुटुंब सधन होतं, अशी माहिती दिली. ते म्हणाले, कुटुंबात वाद होता. आई-वडिलांना समजूत द्यायची होती. आई-वडिलांना फक्त भीती द्यायची होती. त्यामुळे तो कड्यावर गेला. पण अचानक तोल गेला आणि सर्वजण खाली पडले. आई-वडिलांना फक्त भीती द्यायची होती, पण होत्याचं नव्हतं झालं.” कुणालच्या मावशीचे पती म्हणजेच काका म्हणाले, कुणालचं शिक्षण चालू होतं. आताच दहावी झाली होती. ९५ टक्के मिळाले होते. तो नीटच्या परीक्षेची तयारी करत होता.
दुसऱ्या मावशीच्या पतीने सांगितलं की, “आई-वडिलांनी पोरांवर अशी वेळ येऊ दिली नाही पाहिजे. अशा घटना सगळीकडेच सुरू असतात. ही बातमी मोठी झाली त्यामुळे सर्वांना कळलं. पती-पत्नीला एकमेकांचं बोलणं टोचायचं. लहान मोठं वाद होते. पण फार मोठे वाद नव्हते. कुणाल शाळेत खूप हुशार होता. “कुणालने आयफोनचे हप्ते थकवल्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यावर त्याचे काका म्हणाले, “त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांची शेती वगैरे आहे. नीट परीक्षेच्या क्लाससाठी तीन लाख रुपये भरले होते. त्याच्याकडे दोन आयफोन आहेत. त्यांच्याकडे कुत्रा आहे, त्याचाच महिन्याचा खर्च ७ ते ८ हजार रुपये आहे. म्हणजे त्यांचं एकदम चांगलं होतं.”
एक भाऊ होता. तो आजारी होता.
कुणालला दहावीत ९५ टक्के गुण, काकांनी दिली धक्कादायक परिस्थितीची माहिती ,आई-वडिलांमध्ये होता वाद
- Advertisement -


