अहिल्यानगर: अन्न सुरक्षेबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर; विशेष प्रशिक्षणाचे आयोजन!

अहिल्यानगर: अन्न सुरक्षेबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर; विशेष प्रशिक्षणाचे आयोजन!

अहिल्यानगर – विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस, पौष्टिक व सुरक्षित अन्न मिळावे तसेच शाळा परिसरात अन्नसुरक्षा मानकांची कठोर अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने पंचायत समिती, अहिल्यानगर व अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी अन्नसुरक्षा विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन काळभैरवनाथ देवस्थान मंदिर ट्रस्ट सभागृह, आगडगाव येथे करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक ज्येष्ठ विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.

अहिल्यानगरचे अन्नसुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांनी अन्नसुरक्षा मानके, शाळेतील भोजन व्यवस्था, स्वच्छता, अन्न तयार करण्याच्या पद्धती तसेच अन्न विक्रीसंदर्भातील नियमांची सविस्तर माहिती दिली. सहाय्यक अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी शाळा परिसर तसेच शाळेबाहेरील परिसरातील अन्न विक्रीबाबत मार्गदर्शन केले.

गटविकास अधिकारी अक्षय गार्डे यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची अन्न सुरक्षा व मानके विनियम 2020 च्या अंमलबजावणी संदर्भात भूमिका व जबाबदारीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.

सुरक्षित व संतुलित अन्न सर्व विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी सर्व कायदेशीर उपाययोजना करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी आवाहन केले.

शालेय पोषण आहार अधीक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला साठे यांनी 28 जुलै 2026 च्या शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार अनुपालन आदेशा संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रशिक्षणादरम्यान शाळा परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ ठेवणे, शाळांमध्ये अन्नसुरक्षिततेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करणे, अन्नसुरक्षा नियमांचे नियमित निरीक्षण करणे तसेच अन्नसुरक्षा परवाना व नोंदणी करून घेणे, याबाबत उपस्थित प्रशिक्षणार्थींना पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगावचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सर्वांचे स्वागत करून ट्रस्टच्या वतीने सर्वांसाठी चहापान व भोजन (महाप्रसाद) व्यवस्था केली.

तालुका प्रशासनाच्या वतीने केंद्रप्रमुख नानासाहेब गाढवे यांनी प्रशिक्षणातून स्वच्छ, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नुसार सविस्तर मार्गदर्शन मिळाले असून, प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन झाले असल्याचे नमूद करून उपस्थित सर्वांचे व श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles