onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -24-08–2026 एकुण कांदा गोणी -90,800
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 4000 ते 4700
2.नंबर= 2900 ते 4000
3 नंबर= 1900 ते 2900
4 नंबर= 1000 ते 1900
————————————————————————————————————————————————–
मुळा धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर, साठा 97 टक्क्यांवर
राहुरी -जिल्ह्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरणही आता ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 25261 दलघफू (97 टक्के) झाला होता. कोतूळ येथून मुळा नदीतून 2635 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. उजवा आणि डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरू आहे.
या मुळा धरणावर अहिल्यानगरची एमआयडीसी, राहुरी, नगर, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील पाणी योजना, तसेच शेतीचे पाणी अवलंबून आहे. या धरणातील पाणीसाठ्यावरच या भागातील शेतकरी शेतकरी आपल्या शेती पिकांचे नियोजन करीत असतात. उत्तर नगर जिल्ह्याला लाभदायी असलेले भंडारदरा, निळवंडे ही धरणं तुडूंब आहेत.
नाशिक जिल्हयातील धरणं पण या जिल्ह्याला फायदेशीर असलेली दारणा, गंगापूर व अन्य धरणंही ओसंडून वाहत आहे. पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील पाणीसाठाही 90 टक्क्यांवर गेला आहे. आता मुळा धरणही तुडूंब होणार असल्याने शेतकर्यांत समाधानाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील धरणं अजूनही रिकामी असताना, मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील छोटी-मोठी धरणं तुडंब आहेत.


