नगर तालुक्यात तरुणीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

नगर तालुक्यात तरुणीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल
अहिल्यानगर -तालुक्यातील पारेवाडी शिवारात एका 21 वर्षीय मजुरी करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात माथणी येथील संशयित आरोपी परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मूळची उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील रहिवासी असलेली 21 वर्षीय पीडित तरुणी सध्या पारेवाडी परिसरातील एका गोठ्यालगत असलेल्या खोलीत राहते. 25 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडिता आपल्या खोलीमध्ये झोपलेली होती. यावेळी माथाणी येथील संशयित आरोपी परदेशी (पूर्ण नाव माहीत नाही) याने खोलीत अनधिकृतपणे प्रवेश केला. त्याने तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. पीडितेने प्रतिकार करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचे दोन्ही हात पकडून तोंड दाबले. तसेच कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेला खोलीत डांबून बाहेरून दरवाजाची कडी लावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस हवालदार सरोदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

———————————————————————————————————-
अज्ञात इसमाने पेटवून दिलेली इरटिगा कार व मोटारसायकल जळून खाक झाली आहे. दि.25 ऑगस्ट रोजी टाकळीमिया येथील खळवाडी परिसरात ही खळबळजनक घटना घडली.

संतोष रामचंद्र शिंदे (रा.टाकळीमिया) यांचा भाडेतत्त्वावर वाहने पुरविण्याचा व्यवसाय आहे. शिंदे यांनी नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेस एमएच.43 ए. एल 2281 ही मोटरसायकल व एमएच 17 सी.डी 1170 इरटिगा कार घरासमोर पार्किंग केलेली होती. मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास संतोष शिंदे यांना अचानक झोपेतून जाग आली. ते घराबाहेर आले असता घरासमोरील दोन्ही वाहने कोणीतरी अज्ञात इसमांनी पेटवून दिल्याचे दिसून आले.

संतोष शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक जागे झाले.त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. मात्र,आगीची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली. या घटनेमुळे शिंदे यांचे 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी संतोष शिंदे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार विजय नवले हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles