onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -27-08–2026 एकुण कांदा गोणी -1.05,030
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 3700 ते 4200
2.नंबर= 2300 ते 3700
3 नंबर= 1400 ते 2300
4 नंबर= 700 ते 1400
————————————————————————————————————————————————–
अखेर भंडारदरा, निळवंडे 100 टक्के भरले!
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा आणि 8334 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण अखेर काठोकाठ भरले असून या दोन्ही धरणांतून ओव्हरफ्लो सुरू आहे. पावसाचे अल्प प्रमाण असलेतरी धरणात अजूनही हळुवार पाण्याची आवक होत आहे. भंडारदरातून 815 क्युसेक तर निळवंडेतून 350 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. आढळा धरण आणि वाकी तलावही तुडूंब आहे.
राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये धरणं रिकामी असलीतरी सुदैवाने कोकणकडा आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व धरणं काठोकाठ भरली आहेत. 26000 दलघफू मुळा धरणातील पाणीसाठाही 97 टक्क्यांच्या वर आहे. पिंगळगाव खांड, आंबित व इतर छोटी धरणंही तुडूंब आहेत.


