ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करुन अण्णा हजारेंची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करत असून, या चाचण्यांच्या अहवालानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे. अनेक दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वास्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असा त्रास होत होता. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आणि आजारपणामुळे ते अत्यंत अशक्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles