दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचा निर्णय

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. दिशा हिने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप करून तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची।मागणी केली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने बुधवारी या याचिकेवर निर्णय देताना प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे अधिकारी याचिकाकर्त्याचा जबाब नोंदवतील आणि गुन्हा दाखल करतील. याचिकाकर्त्याच्या मुलीचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा तपास हे अधिकारी करतील. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, एखाद्या व्यक्तीविरुद्ध वाजवी संशय घेण्याजोगी पुरेशी कारणे आहेत असे तपास अधिकाऱ्याला वाटल्याशिवाय, त्या व्यक्तीला आरोपी मानले जाणार नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

हा तपास ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ च्या तरतुदींनुसार केला जाईल व गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले, तर सक्षम न्यायालयासमोर योग्य तो अहवाल सादर केला जाईल. तपासात कोणताही गुन्हा घडला नसल्याचे आढळून आले, तर सक्षम न्यायालयासमोर योग्य ती ‘समरी’ (अंतिम अहवाल) सादर केली जाईल. मात्र, अशा परिस्थितीत, त्या अहवालाला आव्हान देणारी निषेध याचिका’ दाखल करण्याचा अधिकार याचिकाकर्त्याला असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द करतील. तसेच, वर नमूद केलेल्या अटींनुसार ही याचिका निकाली काढण्यात येत आहे. याचिका निकाली काढल्यामुळे, त्याच्याशी संबंधित इतर सर्व अर्जही निकाली काढले जात आहेत, असे न्यायालयाने म्हटले.रण्याचा अधिकार याचिकाकर्त्याला असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles