देवेंद्र फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत. राज्यात ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. फडणवीस सरकारकडून या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदांच्या सीईओंसह विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रवींद्र खेबुडकर यांची च्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. गजेंद्र बावणे महावितरणच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
फडणवीस सरकारने गुरूवारी प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महावितरण तसेच आदिवासी विकास प्रकल्पांच्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या फेरबदलामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच आदिवासीबहुल भागातील प्रशासनाला नवीन नेतृत्व मिळणार असून जिल्हा परिषद आणि उपविभागीय पातळीवरील प्रशासकीय कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
११ आयएएस अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या वाचा यादी –
१. रविंद्र खेबुडकर –
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रविंद्र खेबुडकर यांची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा , पुणे येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२. गजेंद्र बावणे –
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA), पुणे येथील आयुक्त गजेंद्र बावणे यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), छत्रपती संभाजीनगर येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. अपूर्वा बसूर –
जव्हार, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच जव्हार उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अपूर्वा बसूर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. विशाल खत्री –
डहाणू, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तसेच डहाणू उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विशाल खत्री यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. डोनुरु अनन्या रेड्डी –
नांदेड येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डोनुरु अनन्या रेड्डी यांची डहाणू, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच डहाणू उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. पी.के. सिद्धार्थ रामकुमार –
नाशिक येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पी.के. सिद्धार्थ रामकुमार यांची जव्हार, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तसेच जव्हार उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७. कुश मोटवानी –
नागपूर येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कुश मोटवानी यांची वर्धा उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८. आकाश वर्मा –
वाशिम येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आकाश वर्मा यांची गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
९. नंदला साईकिरण –
गोंदिया येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नंदला साईकिरण यांची भंडारा उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०. योगेश कुमार मीना –
हिंगोली येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या योगेश कुमार मीना यांची जळगाव उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
११. शिवांश सिंह –
नंदुरबार येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शिवांश सिंह यांची अहेरी, गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तसेच अहेरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


