Sunday, February 22, 2026

धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकाचे जीव धोक्यात ,नगरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा

नगरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा
सह्याद्री छावा संघटनेची तक्रार; धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकाचे जीव धोक्यात
30 मे रोजी उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- नगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग उभ्या राहिल्या असून, त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. विनापरवाना होर्डिंगच्या एजन्सीवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी करुन महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
सदर प्रकरणात त्वरीत कारवाई न झाल्यास 30 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी दिला आहे. नगर शहरातील अहिल्यानगर महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी सुरक्षा नियम धाब्यावर बसवून, विद्युत महावितरणच्या परवानगीविना अनधिकृत होर्डिंग उभारले गेले आहेत. हे होर्डिंग विद्युत तारांच्या अगदी जवळ उभे असल्याने विजेचा शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी अशाच प्रकारच्या एका होर्डिंगमुळे विजेचा धक्का लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडल्यास महापालिका आणि जाहिरात एजन्सींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संघटनेने केलेल्या आरोपानुसार, जाहिरात एजन्सींनी कामगार सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना राबवलेली नाही. त्यांच्याकडे खरे परवाने नसून बोगस कागदपत्रांवरच कामगार कार्यालयाकडून परवाने मिळवण्यात आले आहेत. या सर्व प्रकारात महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही, असा ठपका ठेवत संघटनेने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यात धोकादायक होर्डिंग नागरिकांच्या जीवावर उठले आहे. एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी अशा होर्डिंगवर व त्या जाहिरात एजन्सीवर कारवाई करणे अपेक्षित आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग यांना पेव फुटले असून, जाहिरात एजन्सी व मनपातील संबंधित अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. -रावसाहेब काळे पाटील (प्रदेश कार्याध्यक्ष, सह्याद्री छावा संघटना)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles