अश्लील डान्सचा मुद्दा पुन्हा तापला! गौतमी पाटील याच व्हिडीओमुळे अडचणीत; स्टेजवरची ती अॅक्शन भोवणार?

नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचा चाहत्यांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी चाहत्यांशी संवाद साधताना दिसत असून, तिच्या बोलण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील चाहत्यांशी संवाद साधताना “आरे डार्लिंग लोक आहेत रे तुम्ही माझे, हिकडे मी भाव हे ते मानत नाही बरका, एक पप्पी देते तुम्हाला” असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ दहीहंडीच्या कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमात नृत्य सादर केल्यानंतर गौतमीने चाहत्यांशी संवाद साधला. याच संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून तिच्या नृत्यशैली, हावभाव आणि कार्यक्रमांतील संवादांमुळे चर्चेत आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात तिच्या डान्सनंतर पुन्हा एकदा तिच्यावर टीका होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता गौतमी पाटीलच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे. केवळ गौतमी पाटीलच नाही तर कार्यक्रमाच्या आयोजकांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तक्रार दाखल केल्यानंतर मृणाल पेंडसे यांनी आपण ही तक्रार कोणत्याही राजकीय हेतूने केली नसल्याचे म्हटले आहे. “राजकीय म्हणून मी तक्रार करण्यासाठी आलेली नसून एक महिला म्हणून तक्रार करत आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, कोणताही राजकीय पक्ष असो, त्याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचे कथित अश्लील हावभाव, नृत्य आणि संवाद सादर केले जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles