राज्यात मुसळधार पाऊस पडणार! पंजाबराव डखांनी वर्तवला बळीराजाला दिलासा देणारा अंदाज

पावासाळा सुरु होऊन ती महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया चालली आहेत. पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. 13 सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचं डखांनी सांगितलं आहे. मात्र, 14 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 14 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पंजाबराव डख यांनी 6 सप्टेंबर रोजी दिलेल्या अंदाजानुसार, 13 सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असून त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांत चांगला ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 13 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

13 सप्टेंबरला काही भागात सुरुवात झाल्यानंतर 14 सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो. त्यामुळे सध्या कोरडे असलेले छोटे तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles