दुष्काळ निवारणासाठी उपसमिती गठीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन वाळून गेलाय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर, विविध शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, त्यासाठी फिल्डवरुन माहिती गोळा केली जाईल. बहूतांश भागात पीकं करपली आहेत. ⁠सोयाबीन आणि कापूस पिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे, ⁠कोकणात भातावर परिणाम झाला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. विशेष करुन ⁠पिण्याचं पाणी आणि जनावरांचा चारा यावर लक्ष द्यायच ठरलं आहे. ⁠महापालिका, नगरपालिका आणि पंचायत राज संस्था यांच्याकडे पिण्याच्या पाणीसंदर्भातील निर्णय दिले आहेत, असे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ⁠गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, बाबासाहेब पाटील अन्य मंत्री असतील, समितीचे सचिव हे मुख्य सचिव असतील, दुष्काळ संदर्भात अपडेट या समितीकडे दिले जातील. या उपसमितीला अधिकार दिले आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मी ही उद्या दौरा करणार आहे, ⁠सर्व मंत्री आणि आमदार बांधावर जातील. एनडीआरएफचे काही नियम आहेत, त्यानुसार प्रक्रिया सुरू राहिल⁠. मात्र, आम्ही वाट पाहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारण उपसमिती स्थापन
दरम्यान, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील हे सदस्य असणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे देखील उपसमितीचे सदस्य सचिव असतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles