श्री ढोकेश्वर विद्यालयात ‘ पर्यावरण पूरक आकाश कंदिल बनवा’ कार्यशाळा
टाकळी ढोकेश्वर
श्री ढोकेश्वर विद्यालयात विद्यार्थांसाठी इको फ्रेंडली आकाश कंदिल तवार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली आपल्या हाताने आपल्याला हवा तसा आकाशकंदिल बनवून अभिमानाने तो घराच्या दारावर टांगण्यात एक वेगळाच आनंद असतो. भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त विद्यर्थ्यांमध्ये उपजत असणारे सुप्तगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, या हेतूने इको फ्रेंडली आकाश कंदिल बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कलाशिक्षक तथा चित्रकार नारायण शेळके यांनी इको फेंडली आकाश कंदिल तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व याचे महत्व समजावून सांगितले., विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून माफक खर्चामध्ये व कमी वेळेत सुंदर व आकर्षक आकाश कंदिल तयार केले. हे स्वतः तयार केलेले आकाश कंदिल विद्यार्थी आपल्या स्वतःच्या घरावर
दिवाळीच्या सणासाठी लावून हा दीपोत्सव साजरा करणार आहेत.
या कार्यशाळेत २१० विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते,
यावेळी विद्यार्थांमध्ये अतिशय आनंदमयी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे, चित्रकार तथा कलाशिक्षक नारायण शेळके,प्रा.अशोक गांगड,प्रा. भाऊसाहेब हिंगडे, प्रा.अतिष झावरे,प्रा.पोपळघट प्रा.महानवर,पवन कुटे, बाबासाहेब जाधव,अतुल सैद, ढोणे,प्रा.जगदाळे,प्रा.नितीन ढोकळे,निलम खिलारी,सुमन वाळुंज,वैशाली गायखे,सोनल रोहकले,महांडूळे,दिनेश वायदंडे ,विष्णु भर्द्रे,स्वप्नील कदम विश्वासराव मॅडम, प्रिया डव्हणे,सुरेखा ठाणगे, खरे,शिर्के आदी उपस्थित होते.
प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देत, विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित कंदील बनवत आपली कल्पकता आणि कलाकौशल्याचे दर्शन घडवले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.बाळासाहेब खिलारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.


