Friday, February 20, 2026

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? समोर आली तारीख……

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष शाळा कधी सुरू होणार याकडे लागले आहे. अशात राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याची तारीख समोर आली आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर एसएससी बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी तयारीला सुरूवात करावी.

नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेत परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधी प्रवेशप्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.

राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात. दरवर्षी विदर्भात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जून महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात तापमान असते. त्यामुळे विदर्भातील शाळा उशिराने सुरू होतात.

सीबीएसई बोर्डाची शाळा १ एप्रिलपासूनच सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. आता त्यांच्या उन्हाळी सुट्टी देखील लवकरच संपणार आहे. सीबीएसई बोर्डाची पहिली ते दहावीची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शाळेत जाण्याच्या तयारीला सुरूवात केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles