अहील्यानगर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने मोठे संकट उभे केले आहे.नगर तालुक्यातील अकोळनेर येथील सोनवाडी येथे झालेल्या नूकसानीची पाहाणी केली.
शेतकरी,स्थानिक ग्रामस्थ यांची भेट घेवून निर्माण झालेल्या समस्या जाणून घेतल्या.झालेल्या नूकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना महसूल कृषी विभागाला दिल्या.बंधारे कालवे पाण्याच्या प्रवाहाने फुटले आहेत.यासंदर्भात भविष्याचा विचार करून कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.
शेतकर्यांनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीने विचार करेल.या संकटाप्रसंगी सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. आ.शिवाजीराव कर्डीले आ.काशिनाथ दाते
जिल्हाधिकरी डाॅ पंकज आशिया यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंगळवारी नगर तालुक्यात ढगफुटी सदृष पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोळनेर, खडकी येथे केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट, प्रतिक शेळके, माजी सरपंच प्रविण कोठुळे, राघु चोभे, मनेष भोसले, बाळासाहेब कोठुळे, राहुल बहिरट यांच्यासह अकोळनेर व खडकी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान बुधवार सकाळपासून नुकसानग्रस्त भागात महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे 100 पेक्षा अधिक जनावरे व 200 शेळ्या वाहून गेल्या असल्याची माहिती मिळत आहे. महावितरणचे सुमारे 200-300 पोल पडले आहेत. विद्युत रोहित्र पडले असल्यामुळे गावागावांमध्ये विजेचा खेळखंडोबा झाला आहे. धो धो पावसामुळे रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.


