माजी आमदार राहुल जगताप यांचा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्याचे माजी आमदार मा. श्री. राहुल जगताप‚ श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना चेअरमन मा. श्री. राजेंद्र नागवडे यांनी पक्षात प्रवेश केला.
माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बुधवारी (दि.28) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. जगताप-नागवडे हे पाचपुते विरोधक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. तालुक्याचे राजकारण पाहता पाचपुते यांना सक्षम विरोधी पर्याय असणे नेत्यांना गरजेचे असल्याने अनेकांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने नेत्यांनी सत्ताधारी पक्षात नेत्यांनी प्रवेश केला आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. 27) राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या स्वतंत्रपणे दोघांच्याही भेटी घेतल्या. त्यानंतर तटकरे यांच्या उपस्थितीत जगताप व नागवडे यांची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर जगताप व नागवडे दोघांनीही एकत्रितपणे काम करण्यास होकार दिला. त्यानुसार त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले व बुधवारी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


