Saturday, February 21, 2026

वैष्णवीच्या आत्महत्येचे मुख्य कारण वेगळंच, हगवणेंच्या वकिलाची कोर्टात माहिती; म्हणाले…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. आजच्या सुनावणीदरम्यान हगवणेंच्या वकिलाने कोर्टामध्ये धक्कादायक युक्तीवाद केला. वैष्णवीच्या आत्मह्येचे मुख्य कारण वेगळंच असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले. तसंच, ‘वैष्णवीला मोबाईलमध्ये नको त्या व्यक्तीशी चॅट करताना पकडले होते. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी.’, असा धक्कादाक दावा हगवणेंच्या वकिलांनी केला.

आजच्या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाने कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत अनेक गंभीर आरोप केले. ‘वैष्णवीची टेंडंसीच सुसाईड करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला एका व्यक्तीसोबत चॅट करताना पकडले गेले होते. समोरून तिला त्रास दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असावी.’, असा दावा हगवणेंच्या वकिलाने केला आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये तिच्या नवऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपल्यामुळे आरोपी शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे, लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेने टोकाचे पाऊल उचलले होते. वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर १७ मे रोजी तिचा नवरा शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, नणंद करिश्मा आणि दीर सुशीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच वैष्णवीचा नवरा, नणंद आणि सासूला अटक करण्यात आली होती. पण तिचे सासरे आणि दीर हे फरार होते. या दोघांना सातव्या दिवशी अटक करण्यात आली होती.

सध्या कोठडीत असलेल्या हगवणे कुटुंबाची बाजू अॅड. विपुल दुशिंग यांनी मांडली. त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये वैष्णवीचे अन्य पुरुषाशी संबंध होते, असा दावा केला. त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, अशी नवी थिअरी हवगणे कुटुंबाचे वकील अॅड. दुशिंग यांनी मांडली.

तसेच, वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं. तर एकदा तिने गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तीवाद दुशिंग यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles