पोलीस दलात खळबळ….नगर शहरातील आणखी एका पीआय विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहिल्यानगरचे कोतवाली पोलिस ठाणे पुन्हा वादात, आणखी एका पीआय विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाणे हे सर्वांत संवेदशनील भागातील आणि महत्वाचे पोलिस ठाणे आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखणे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखण्यासाठी पोलिसांना सतत कार्यरत रहावे लागले. असे असले तरी या पोलिस ठाण्यातील नियुक्ती ही प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे ही मलईदार नियु्क्ती मिळविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असते.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या पोलिस ठाण्यात नियुक्त झालेले अधिकारी काही ना काही वादात अडकले आहेत. केवळ भ्रष्टाचार नव्हे तर महिलांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुख्य म्हणजे या पोलिस ठाण्याचा इतिहास पाहिला तर अगदी बोटावर मोजण्याएवढेच अधिकारी आपला कार्यकाळ कोणताही डाग न लागता पूर्ण करून गेले आहेत. बाकीचे कुठल्या ना कुठल्या वादात अडकून येथून गेले आहेत. येथे येताना कडक शिस्तीचे म्हणून ओळख असलेले अधिकारीही वादात अडकून, बदनाम होऊन येथून गेले आहेत. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. अद्यापही अनेक जण येथे असताना दाखल झालेले खटले सोसत आहेत.
अलीकडेच या पोलिस ठाण्यात बदलून आलेले आणि कडक शिस्तीचे म्हणून ओखळले जाणारे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हेही आता अशाच प्रकरणात अडकले आहेत.
आजच त्यांच्याविरूद्ध एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळची हुबळी, पश्चिम बंगाल आणि आता मुंबईत राहायला असलेल्या ३० वर्षीय तरुणीने ही फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दराडे यांनी ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत या तरुणाीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पालघर येथील फार्म हाऊस व तरुणीच्या घरातही असे कृत्य केले. अलीकडे दराडे यांनी तरुणीवर दबाव आणून तिला झाले गेले विसरून जाण्यास बजावले. सोडून जावे म्हणून धमकी दिली. तरुणीने पोलिसांत तक्रार करते, असे सांगितले असते काय करायचे ते कर असे सांगितले. त्यामुळे तरुणीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दराडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आणि कोतवालीच्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या यादीत एकाची भर पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles