संघ स्वयंसेवकाचे प्रेरणास्त्रोत म्हणजेच पोपटराव — ॲड चंदू भाऊ कुलकर्णी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक ॲड पोपटराव देशपांडे यांचा नगर तालुका व अहिल्यानगर विचार परिवार च्या वतीने सन्मान सोहळा, पटेल मंगल कार्यालय, टिळक रोड, अहिल्यानगर येथे रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:30 वा जिल्हा सरकारी वकील ॲड सतीश पाटील व पुणे जिल्ह्याचे संघचालक ॲड चंदू भाऊ कुलकर्णी, अहिल्या नगरचे जिल्हा संघचालक श्री वाल्मिक जी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यावेळी आपल्या मुख्य भाषणामध्ये ॲड चंदू भाऊ कुलकर्णी यांनी वरील उद्गार काढले. ती पुढे म्हणाले की पोपटराव यांनी ज्या कालखंडामध्ये काम केलं त्या काळामध्ये नगर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये संघाच्या शाखा नियमितपणे लागत असत. त्यावेळी जेवढ्या उत्साहाने त्या शाखा लागत असत आज पुन्हा त्या गावांनी शाखा लागल्या पाहिजेत असा आग्रह त्यांनी आपल्या भाषणामध्ये धरला. पोपटराव यांनी ज्या कालखंडामध्ये नगर तालुक्यामध्ये काम केलं तो काळ हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांना अत्यंत अवघड असा कालखंड होता. तरीही मोठ्या धैर्याने कुशलतेने त्यांनी नगर तालुक्यात हिंदुत्वाची बीजे रोवली आणि आज त्याचाच वटवृक्ष झाल्याचा आपण पाहतो आहोत असे पुढे ऍड कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा सरकारी वकील ॲड सतीश जी पाटील यांनी पोपटरावांचा आपल्या भाषणात गौरव केला ते पुढे असे म्हणाले आज पोपटरावांचा हा मित्रपरिवार पाहिला की म्हणावेस वाटते की पोपटरावांचे जीवन सार्थक झाले. एवढी लाखमोलाची माणसं त्यांनी कमावली एवढा मोठा परिवार त्यांनी कमावला आहे. अत्यंत सरळ साधा निष्कलंक आणि विचारधारेवर प्रेम करणारा एक मित्र म्हणून मी नेहमीच पोपटरावांकडे पाहत आलो आहे. सत्काराला उत्तर देताना ॲड पोपटराव देशपांडे म्हणाले संघाने ज्या ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या त्या त्या मी मोठ्या निष्ठेने पार पाडले, नगर जिल्हा एवढा सोपा नाही मी त्या काळामध्ये नगर तालुका व सर्व जिल्हा आणि संघ विचार गावगावी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मी कधीही स्वतःसाठी काहीच मागितले नाही संघाची कृपा व संघाचे आशीर्वाद मला आयुष्यात कामाला आलेत. पुढील आयुष्यातही संघ विचारापासून कधीच वेगळा राहणार नाही होणार नाही अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली. व सन्मान केल्याबद्दल आयोजक आणि उपस्थित सर्वांचे आभार मानतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा भानुदास बेरड यांनी केले, प्रा भानुदास बेरड यांनी पोपटरावांच्या सत्काराचे आयोजन का केले त्याची कारणमीमांस आपल्या प्रास्ताविकात केली. नगर तालुक्यातील हिंदुत्ववादी चळवळीची बीज ही पोपटरावांनी पेरलेली आहेत आणि आणि तेच हिंदुत्वाच्या विचारधारेच्या जी भव्य इमारत आपण पाहतो आहोत त्या इमारतीचा पाया त्यांनीच घातला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावं आणि या निमित्ताने सर्व जुने कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण व्हावं हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी संघचालक श्री बाळासाहेब वाघ, अहिल्यानगर जिल्ह्याचे विद्यमान संघचालक श्री वाल्मीक जी कुलकर्णी, जिल्हा सहकार्यवाह दिनेश जी करंडे, श्री विठ्ठल खांदवे, पंचायत समितीचे भाजपा गटनेते श्री रवींद्र कडूस, नगर शहराचे अध्यक्ष श्री अनिल मोहिते, डॉक्टर सुनील गंधे, श्री दादा ढवण, आदी वक्त्यांची समयोचित भाषणे झाली. मंचावरील प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री रमेश जी पिंपळे यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन पोपटरावांचे पुतणे अभिजीत देशपांडे यांनी केले. हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी केले.
या कार्यक्रमास संघाचे जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी, नगर तालुका संघ चालक श्री भरत निंबाळकर, श्री पोपट काळे, श्री महेंद्र भाई चंदे, श्री अभय जामगावकर, श्री बाळासाहेब वाव्हळ, श्री राजेंद्र काळे, श्री सुनील रामदासी, श्री श्याम पिंपळे, श्री चंद्रकांत खजिनदार, श्री रघुनाथ ठोंबरे, हिंदुराष्ट्र सेनेचे संजय आडोळे, श्री गौतम जी कराळे, श्री साहेबराव विधाते, श्री सुयोग धामणे, श्री चिपडे, श्री मुकुल गंधे, श्री महेश वाघ, श्री सखाराम गरुडकर, श्री अशोक गायकवाड, भाऊसाहेब काळे, आधी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक ॲड पोपटराव देशपांडे यांचा अहिल्यानगर विचार परिवार च्या वतीने सन्मान सोहळा
- Advertisement -


