अण्णा हजारेंना अभिजित दीपकेचा सल्ला; म्हाताऱ्या माणसांनी आश्रमात बसावं, निवृत्ती घ्यावी

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ सुरु केली. त्यानंतर नीट पेपरफुटीविरोधात आवाज उठवला. आता याच अभिजीत दीपकेंना तुम्ही अण्णा हजारेंची भेट घेणार का? या चळवळीचा भाग त्यांना करुन घेणार आहात का? असं विचारलं असता म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त व्हावं आश्रमात जावं असं म्हणत अण्णा हजारेंवर टीका केली आहे. आता या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना ‘तुम्ही अण्णा हजारे यांची भेट घेणार का?’ असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दीपके यांनी आपण अण्णा हजारे किंवा इतर कोणाचीही भेट घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. अण्णा हजारेंवर त्यांनी थेट टीकाही केली.

आपली भूमिका स्पष्ट करताना अभिजीत दीपके म्हणाले की, “ज्यांचे वय ६० ते ७० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, अशा लोकांनी आता स्वतःहून सर्व सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून निवृत्त झाले पाहिजे. हा प्रश्न थेट देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे आम्ही काय करायचं आणि आमचं भविष्य कसं घडवायचं, हे सर्वस्वी आम्हाला म्हणजेच तरुणांना ठरवू द्या. ज्या म्हाताऱ्या लोकांचं सर्व काही झालं आहे त्यांनी आता निवृत्त होऊन आश्रमात विश्रांती घ्यावी. त्यांनी उगाचच तरुणांच्या भवितव्याचे निर्णय घेऊ नये.” अशा शब्दांत अण्णा हजारेंबाबत अभिजीत दीपकेंनी भूमिका मांडली आहे. अभिजीत दीपकेंच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles