मुंबई: दिनांक 21 व 22 मे 2026 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात ‘NEET मुळे राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण प्रवेशाला फटका बसण्याची किंवा प्रवेश रखडणार’ अशा वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे खुलासा करण्यात येत आहे.
मुख्य मुद्दे:
1. NEET 2026 चे गुण केवळ खालील 9 अभ्यासक्रमांसाठी ग्राह्य: 1. Agriculture Engineering 2. Biotechnology 3. Food Engineering 4. Leather Technology 5. Packaging Technology 6. Pharmaceutical Engineering 7. Printing Engineering 8. Fashion Technology 9. Textile Chemistry 2. इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांवर परिणाम नाही: सदर 9 अभ्यासक्रम राज्यातील फक्त 17 शासकीय संस्थांमध्ये आहेत. या 9 अभ्यासक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेश नेहमीच्या पद्धतीने व वेळेत होतील. NEET मुळे त्यांना कोणताही फटका बसणार नाही. 3. प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. AICTE कडून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसारच प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येईल. 4. NEET निकालास विलंब झाल्यास उपाययोजना: NEET पुनर्परीक्षा 2026 चा निकाल लागण्यास विलंब झाल्यास वरील 9 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येतो. अशा 15% अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात येईल.
त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम बाळगू नये, असे आवाहन सीईटी कक्षाच्या वतीने करण्यात येत आहे


