नगर (सचिन कलमदाणे) : अहिल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीत मोठी घडामोड झाली आहे. भाजप ्व राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षित जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदींनी हा निर्णय जाहीर करत सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत एकत्रित शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेच्या तब्बल २४ जागा निवडून आल्या होत्या. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर जवळपास २३ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. सर्व विद्यमान नगरसेवक पुन्हा इच्छुक असताना भाजप राष्ट्रवादीने शिवसेनेच्या अनेक विद्यमान जागांवर दावा केला तसेच अवघ्या ९ जागा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे शिवसेनेने महायुतीशी फारकत घेतली आहे.
Ahilyanagar Breaking…. महायुतीत बिघाडी…शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार !
- Advertisement -


