तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर हद्दीत अवैधरित्या मावा व सुगंधी तंबाखू बनवणाऱ्या 2 ठिकाणांवर
छापे टाकण्यात आले.
मुख्य मुद्दे:
• एकूण जप्त मुद्देमाल: ₹3,34,750/- किमतीचा • कारवाईचे आदेश: पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या आदेशाने सपोनि माणिक चौधरी, M.I.D.C. पोलीस स्टेशन यांनी केली.
1. पहिला छापा – बाराईमाम, कोटला
• आरोपी: शाहिद फारुख शेख, वय 25 • जप्त माल: ₹1,66,550/- चा मावा तयार करण्यासाठी लागणारी सुपारी, सुगंधी तंबाखू, मावा तयार करण्याची मशीन व तयार मावा
2. दुसरा छापा – गुलमोहर रोड, आम्रपाली मंगल कार्यालयासमोर
• आरोपी: अक्षय राजू पवार, वय 19, रा. निबळक • जप्त माल: ₹1,68,200/- चा मावा तयार करण्यासाठी लागणारी सुपारी, सुगंधी तंबाखू, मावा तयार करण्याची मशीन व तयार मावा
नोंदवलेले गुन्हे:
दोन्ही आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 457/2026 व 458/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम 2006 व नियम 2011 चे कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(d), 30(2)(a), 3(1)(zz)(iv), 59 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
कारवाई करणारे पथक: सपोनि माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राकेश खेडेकर, राजु सुद्रीक, अजिनाथ पालवे, मुकुंद दुधाळ, साईनाथ टेमकर, संदीपान पितळे, दिपक धुंदे, नवनाथ दहिफळे, सुरज देशमुख, किशोर जाधव, अक्षय रोहोकले, उमेश शेरकर, सचिन हरदास.


