अहिल्यानगर-विवाहितेला सासरी पैशासाठी त्रास देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मुकुंदनगर परिसरात राहत असलेल्या पीडित 21 वर्षीय विवाहितेने यासंदर्भात गुरूवारी (9 ऑक्टोबर) दुपारी फिर्याद दिली आहे.ही घटना तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे 2020 पासून 2024 पर्यंत घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पती शाहबाज बशीर शेख, सासु परवीन बशीर शेख, सासरे बशीर बडोभाई शेख, मोठा दीर अर्शद बशीर शेख (सर्व रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्नानंतर काही दिवस चांगले वागणूक मिळाल्यानंतर तिचा पती शाहबाज शेख, सासू परवीन शेख, सासरे बशीर शेख आणि मोठा दीर अर्शद शेख यांनी पैशासाठी वारंवार दबाव आणत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली, तसेच धमक्या देऊन त्रास दिला गेला.
पीडिताने सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार दिली. मात्र तेथे समझोता न झाल्याने त्यांनी दिलेल्या पत्रानंतर कॅम्प पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


