मध्यवर्ती शहरातील आनंदी बाजार रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली
महापालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे वकीलपत्र न घेता काम करण्याच्या सूचना द्याव्यात – आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर : महापालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे वकीलपत्र न घेता काम करण्याच्या सूचना द्याव्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, रात्री लाईट जात असते. खोदलेले रस्त्या संदर्भात नागरिकांना कळण्यासाठी बॅरिकेटेड, सूचना बोर्ड, दिशादर्शक फलक लावण्याचे काम करावे. विकास कामांमध्ये “सी” नावाचे लोक नागरिकांमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत असतात. मात्र नागरिक विकास कामे पाहून समाधान व्यक्त करत आहे. नगरकरांचे अनेक वर्षाचे काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे स्वप्न होते ते पूर्ण करून देण्याचे काम केले आहे. एकट्या केडगाव मधे १५० कोटी रुपयांची विकास कामे पूर्णत्वाकडे जात आहे. सध्या शहरात उंदीर घुशीचे प्रमाण वाढले असले तरी विकास कामांमुळे ते आता नष्ट होतील. मध्यवर्ती शहरातील ड्रेनेजलाईन, रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे यापूर्वी कधीही नियोजनबद्ध झाली नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात तर चितळे रोड, आनंदी बाजार, गांधी मैदान, गाडगीळ पटांगण या परिसरात पावसाचे पाणी अक्षरशः नागरिकांच्या दुकानात, घरात तर रस्त्यावरून कमरे एवढे पाणी वाहत असे. या मध्ये अनेक दुर्घटना घडल्या जात होत्या. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या निधी प्राप्त करून दिला. त्यानुसार जमिनी अंतर्गत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी १२०० व्यासाची मोठी बंद पाईप गटर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर जिल्हा वाचनालय, गांधी मैदान, पटवर्धन चौक, गाडगीळ पटांगण, अमरधाम रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी सुटणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती शहरातील आनंदी बाजार रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी मा. उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, दीपक सूळ, मा. सभापती किशोर डागावले, गणेश कवडे, मा. नगरसेवक दत्तात्रय तात्या मुदगल, मा. नगरसेवक अजय चितळे, संतोष गेनप्पा, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सुहास पाथरकर, कैलास दळवी, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर, अक्षय बल्लाळ, मुकुंद वाळके, गजेंद्र कवडे, रोहन डागवाले, सागर गोरे, वैभव वाघ, राम वाघ, सुनील सूर्यवंशी, मनोज लोंढे, समीर रेखी, बाबासाहेब मुदगल, दत्ता वामन, देविदास मुदगल, सचिन पाथरकर, योगेश गणगले, भैया चितळे, गोरख खंडागळे, अजिंक्य गुरावे, शरद दातरंगे आदी उपस्थित होते.
रस्ता व ड्रेनेज लाईन चे खोदकाम सुरू केले असता जमिनी अंतर्गतील पिण्याच्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन ची मोठ्या प्रमाणात तुट-फूट झाली. त्यामुळे या कामाला थोडासा वेळ लागत आहे. तरी नागरिकांनाची होणारी गैरसोय लवकरात लवकर सोडवण्यासाठी आमचे काम सुरू आहे. थोड्या दिवस हा त्रास सहन करा पुढील १५ ते २० वर्षाचे नियोजन करून ही कामे मार्गी लावली जात आहे. या माध्यमातून या परिसराला सुशोभीकरणाचे रूप देखील प्राप्त होईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
आमदार संग्राम जगताप यांनी पटवर्धन चौक, गांधी मैदान, गाडगीळ पटांगण या परिसरातील अनेक वर्षाचा प्रलंबित पावसाच्या पाण्याचा प्रश्न व रस्त्यांचे प्रश्न हाती घेऊन मार्गी लावली जात आहे. कधी ही न होणारी कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली आहे. लवकरच हि कामे पूर्ण होणार आहे, तरी या परिसरातील नागरिकांनी थोड्या दिवस त्रास सहन करून चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आव्हान माजी सभापती किशोर डागावले यांनी केले.
नालेगाव परिसरातील पावसाच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होता. पाऊस पडला की संपूर्ण शहराचे पाणी नालेगाव परिसरामध्ये येत असते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते, तसेच घरामध्ये पावसाची पाणी घुसून आर्थिक नुकसान होत असते मात्र आता पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठी गटार टाकली असून त्यानंतर रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. हे सर्व कामे आमदार संग्राम जगताप यांच्या मुळेच मार्गी लागले असल्याचे मत माजी सभापती गणेश कवडे यांनी व्यक्त केले.
नालेगावातील नागरिकांना विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी गाडगीळ पटांगणातील मोठी जागा उपलब्ध असून या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे आहेत. या परिसराचे काँक्रिटीकरणाचे काम आमदार संग्राम जगताप मार्गी लावू देणार असल्यामुळे या परिसराला देखील सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होणार आहे. अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान मिळत असल्याचे मत माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक अजय चितळे, संतोष गेनप्पा यांनी काम मार्गी लागत असल्याचे समाधान व्यक्त केले


