Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर महापालिका निवडणुक ;पैशांचे वाटप; पैसे वाटणारे पोलिसांच्या ताब्यात

अहिल्यानगर -महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदारांना पैशांचे वाटप सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत.

तोफखाना सांबरगल्ली परिसरात काही उमेदवारांकडून खुलेआम पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपच्या चारही उमेदवारांनी केला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच भाजप उमेदवारांनी तत्काळ तोफखाना पोलीस ठाणे आणि भरारी पथकाशी संपर्क साधत कारवाईची मागणी केली. यानंतर पोलीस व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत. सदर वाहने दोन दिवसांसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या भाजप विरुद्ध बहुजन समाज पाट अशी थेट लढत रंगली असून, निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजप उमेदवारांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles