onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -21-06–2026 एकुण कांदा गोणी -89,430
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 1600 ते 2000
2.नंबर= 1100 ते 1600
3 नंबर= 500 ते 1100

4 नंबर= 200 ते 500

————————————————————————————————————————————————–
मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक ;तरूणाच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर -मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यावसायिक गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरूणाची तब्बल 5 लाख 98 हजार 999 रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरूध्द येथील सायबर पोलीस ठाण्यात गुरूवारी (18 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. विनीत व्ही., नवीन एस., इलयाराजा ए. (तिघे रा. नेडुमंगड, ता. नेडुमंगड, जि. तिरूअंतपुरम, केरळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एचक्यू एसीसीएस, अहिल्यानगर येथे नोकरीला आहेत. संशयित आरोपींनी फिर्यादीला व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा व भरघोस परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन दिले.

त्यानुसार फिर्यादीकडून विविध माध्यमांतून एकूण 5 लाख 98 हजार 999 रूपये स्वीकारले. मात्र, अपेक्षित परतावा मिळाला नाही. तसेच गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. सदरची घटना 28 नोव्हेंबर 2025 रोजी घडली आहे. या प्रकरणात राजस्थान राज्यातील बानसूर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या झिरो एफआयआरच्या अनुषंगाने अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात 18 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles