onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -07-07–2026 एकुण कांदा गोणी -89,022
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2300 ते 2900
2.नंबर= 1700 ते 2300
3 नंबर= 1000 ते 1700
4 नंबर= 500 ते 1000
————————————————————————————————————————————————–
विजेचा धक्का लागून चिमुरडीचा मृत्यू ;महावितरणविरोधात आ. जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचा ठिय्या
आनंदनगर येथे राहणार्या प्रीती गांगर्डे या चिमुरडीचा महावितरणच्या खांबातील विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला.
आंदोलनात आ. संग्राम जगताप स्वतः सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीत महावितरण प्रशासनाशी चर्चा झाली. अखेर महावितरणकडून संबंधित अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत लेखी स्वरूपाचे पत्र देण्यात आले. तसेच काही अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी आ. जगताप म्हणाले की, आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आलो आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावरच टाकल्या जातात, त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याबाबत आ. जगताप यांनी संताप व्यक्त केला. यावेळी संपत बारस्कर, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, मनोज कोतकर, संभाजी पवार आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाच्या वतीने बालिकेच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत म्हणून 20 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.


