onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -10-08–2026 एकुण कांदा गोणी -62,590
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2400 ते 2900
2.नंबर= 1800 ते 2400
3 नंबर= 950 ते 1800
4 नंबर= 400 ते 950
————————————————————————————————————————————————–
सेनापती बापट मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचे उपोषण
विधानसभा माजी उपाध्यक्ष तथा पारनेरचे माजी आमदार विजय भास्कर औटी संस्थापक असलेल्या सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून ठेवीदारांना न्याय मिळावा, तसेच संस्थेवर तातडीने प्रशासक अथवा अवसायक नेमावा, या मागणीसाठी शेकडो ठेवीदारांनी रविवारी संस्थेच्या शाखेसमोर उपोषण केले. या आंदोलनातून ठेवीदारांच्या क्रांतिकारी आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.
सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलन करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास झंजाड यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. सध्या संस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे.
दरम्यान, संस्थेच्या मालमत्तांची बेकायदेशीर विक्री झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, संस्थेचा कारभार अद्यापही नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष विनोद गोळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. पतसंस्थेवर तातडीने प्रशासक अथवा अवसायक नेमावा, विक्री केलेल्या मालमत्तांची खरेदी रद्द करावी, थकीत कर्जदारांकडून कर्जवसुली करून ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, फॉरेन्सिक ऑडिट तातडीने पूर्ण करावे तसेच दोषी संचालक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.11 व 12 ऑगस्ट रोजी आमदार, खासदार व विविध राजकीय नेत्यांना निवेदने देण्यात येणार आहेत. 14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विनोद गोळे यांनी दिली.


