Saturday, March 7, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुरुजींची मुलगी झाली कलेक्टर….

गुरुजींची मुलगी झाली कलेक्टर….!
संगमनेर (प्रतिनिधी):- गुरुजींची कन्या झाली कलेक्टर – ऋतुजा गायकवाड यशस्वी
संगमनेर तालुक्यातील अशोक लक्ष्मण गायकवाड शिक्षक कुटुंबातील कन्या ऋतुजा अशोक गायकवाड हिने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर 106 रँक मिळवत कलेक्टर पद मिळवून कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती असलेल्या ऋतुजाने शिक्षणात सातत्याने उत्तम यश मिळवले. वडील शिक्षक असल्यामुळे घरातच शिक्षणाचे वातावरण मिळाले. त्याच प्रेरणेतून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अनेक अडचणींवर मात करत तिने अखेर कलेक्टर पद मिळवून आपल्या कष्टाचे चीज केले.
ऋतुजाच्या या यशामुळे तिचे आई-वडील, कुटुंबीय तसेच मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. गावातील ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऋतुजा गायकवाड ही प्रेरणादायी ठरली असून तिच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.

_इ.1 ली ते 4 थी पर्यंत जि.प.प्राथ.शाळा नान्नज दुमाला,ता.संगमनेर येथे शिक्षण घेऊन त्यांनंतर संत ज्ञानेश्वर माऊली हायस्कूल नान्नज,ज्ञानमाता हायस्कूल संगमनेर, श्रमिक विद्यालय संगमनेर या ठिकाणी माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन म.फुले कृषी विदयापीठ राहुरी येथे B.Tech Agri पदवी घेऊन 2 वर्षे दिल्ली येथे पुर्णवेळ अभ्यास करून घवघवीत यश मिळवले आहे._

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles