अर्थसंकल्पात अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी….. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 6 मार्च महाराष्ट्राचा अर्थसंकल सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केले. महत्वाचे म्हणजे दिवंगत अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केली होती. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्याने जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज फडणवीस यांनी अजितदादांच्या पश्चात अर्थसंकल्प सादर केला. काँक्रिट रस्त्यांसह मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.एवढंच नाही तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊ. समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन योजना करण्यात येणार आहेत. समितीच्या शिफारशी आणि निकषानुसार कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील, अशी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. २०४७ पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे.३२ हजार ७५६ कोटी मुख्यमंत्री सौर ऊर्जेसाठी खर्च करण्यात येईल. त्यासाठी यावर्षी देखील २० हजार कोटींची तरतूद केली आहे

शेतीसाठी करण्यात आलेल्या घोषणा
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे
चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे
शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे
अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे
१ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात
गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles