Sunday, February 22, 2026

नगर जिल्हा परिषद परिचर संघटना ९ जुलै पासून होणार बेमुदत आंदोलनात सहभागी

अहिल्यानगर जिल्हा परिषद परिचर संघटना होणार बेमुदत आंदोलनात सहभागी
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ जुलै पासून आझाद मैदान, मुंबई येथे ‘बेमुदत उपोषण’ आंदोलन

– नगर:
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ जुलै पासून आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या ‘बेमुदत उपोषण’ आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मुकुंद तुरे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषदेच्या परिचर कर्मचाऱ्यांचा विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी मागील एक वर्षांपासून भाऊसाहेब पठाण (अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई.) यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू आहे, ग्रामविकास विभागाने दि.१३ जून २०२४ रोजी निर्गमित केलेले आरोग्य सेवक पदाचे सेवाप्रवेश नियमाचे प्रारूपामध्ये जिल्हा परिषदेमधील पूर्वीपासुन सेवेत असलेल्या माध्यमिक शालांत परिक्षा(१० वी) उत्तीर्ण परिचर गट-ड कर्मचा-यांना आरोग्य सेवक पदावर २५ टक्के पदे ही पदोन्नतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तथापि, सदर सेवाप्रवेश नियमांचे प्रारूपास गेल्या वर्षापासून अंतिम मान्यता मिळण्याचे प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमधील वर्ग-४ कर्मचा-यांच्या आरोग्य सेवक पदावर होणा-या पदोन्नत्या नाहक रखडलेल्या आहेत. त्याकरिता सदर प्रारूपास अंतिम मान्यता तात्काळ मिळावी, अशी महत्वाची मागणी आहे. तरी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये परिचर वर्ग-४ पदांवरुन आरोग्यसेवक वर्ग-३ पदांवर पदोन्नती करिता २५ टक्के पदे मिळविणे, तसेच परिचर वर्ग-४ पदांवरुन कनिष्ठ सहाय्यक वर्ग-३ पदांवरील ४०:५०:१० या प्रामाणातील पदोन्नती कोटा पुर्ण होईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया निरंतर राबविणे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पशुसवंर्धन विभागांतील रिक्त पदे तात्काळ सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे, राज्य शासनांच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या बरोबरीने जिल्हा परिषदेंच्या परिचर कर्मचा-यांना २५०/- रूपये धुलाई भत्ता होणे, जिल्हा परिषदेच्या परिचर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नतीचा पहिला लाभ एस-3 (१६६००-५२४००) ऐवजी एस-6 (१९९००-६३२००) होणेसाठी तसेच कनिष्ठ सहाय्यक लिपीक पदांप्रमाणेच कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांवर देखील पदोन्नती / सरळसेवा / वाहनचालकांतून नामनिर्देशनाने हे प्रमाण ४०:५०:१० या व इतर मागण्या पदरांत पाडून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या परिचर कर्मचा-यांनी भाऊसाहेब पठाण (अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई.) यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथे दि.९ जुलै २०२५ पासून होत असलेल्या ‘बेमुदत उपोषण’ आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन मुकुंद तुरे (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना.) यांनी केले आहे. या आंदोलनात जिल्हा शाखा अहिल्यानगर संघटना सक्रिय सहभागी होणार आहे. असे राज्य उपाध्यक्ष सागर आगरकर, राज्य कार्याध्यक्ष अशोक काळापहाड, राज्य संघटक सुरेश भोजणे, जिल्हाध्यक्ष निलेश गाडेकर, जिल्हा सचिव अनुप गायकवाड, कार्याध्यक्ष ऋषिकेश बनकर तसेच अनिल येनगुल, अनघा कुलकर्णी, भारती जाधव , श्रीकांत ढगे, रविंद्र रोकडे,हैबत भांगरे, सिद्धार्थ कदम, प्रकाश धोत्रे, निलेश गोरे, हनुमंत लाकुडझोडे,दादा बरबडे, इंद्रभान गावडे, कमलेश धावणे, सूरेश माळवदे, किरण खेडकर, विजय घुले, सुरेखा भांड,अनिता साठे, संध्या फसले, ज्ञानदेव कदम, विजय वाबळे, निवृत्ती काळे यांनी कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles