Tuesday, March 24, 2026

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता ६,५०० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता ६,५०० रुपयांची लाच घेताना जाळ्यात

​अहिल्यानगर: जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता सचिन सुरेश दिनकर याला ६,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिनकर याने लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​फिर्यादी प्रवीण प्रकाश शिरसाट हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी मौजे देहरे येथील दत्त मंदिर स्मशानभूमी सुशोभीकरणाचे ८ लाख २२ हजार २०६ रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंता सचिन सुरेश दिनकर याने एकूण बिलाच्या २ टक्के म्हणजेच १६,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १०,००० रुपये तक्रारदाराने यापूर्वीच दिले होते. उर्वरित ६,५०० रुपयांसाठी दिनकर याने वारंवार तगादा लावला होता. पैसे दिल्याशिवाय बिल पुढे पाठवणार नाही, अशी भूमिका त्याने घेतल्याने शिरसाट यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
​पोलीस उपअधीक्षक अजित बाळकृष्ण त्रिकुटे यांच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. २३ मार्च रोजी सायंकाळी दिल्ली गेट आणि न्यू ला कॉलेज समोर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी सचिन सुरेश दिनकर याने तक्रारदाराकडून उर्वरित लाचेची रक्कम ६,५०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सरकारी पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली असून, स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवल्याबद्दल दिनकर याला ताब्यात घेण्यात आले.

​या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अजित बाळकृष्ण त्रिकुटे, पोलीस अंमलदार बिंदे, निमसे, कराड आणि हारूण बेग यांचा समावेश होता. शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरुद्ध ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles