गॅस टंचाईच्या काळात नगर तालुक्यात 3 गॅस टॅकर मधुन, अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणारे 4 आरोपी जेरबंद

गॅस टंचाईच्या काळात कामरगाव परिसरात 03 गॅस टॅकर मधुन, अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणारे 04 आरोपी 2,01,09,628/- रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 23/03/2026 रोजी पो.नि/श्री. किरणकुमार कबाडी, स्था. गु. शा. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी पो.उप.नि/समीर अभंग व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे अशांचे पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहीती काढुन कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पोउपनि/ समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत, पुणे ते अहिल्यानगर जाणारे रोड लगत हॉटेल रेणुका दही मिसळ चे पार्किंग मध्ये कामरगांव शिवार ता.जि. अहिल्यानगर येथे अवैधरित्या 03 गॅस टॅकर मधुन व्यवसायीक गॅस टाक्या मध्ये गॅस रिफीलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, ते पो.नि/श्री. किरणकुमार कबाडी यांना कळविले असता त्यांनी खात्री करुन कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
वरील सुचने प्रमाणे नमुद पथकाने तात्काळ पुणे ते अहिल्यानगर जाणारे रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळ चे पार्किंग मध्ये कामरगांव शिवार जावुन खात्री करता. सदर ठिकाणी 03 एच.पी. गॅस टॅकर मधुन गॅस रिफिलींग होत असल्याची खात्री झाल्याने, सदर ठिकाणी छापा टाकुन गॅस रिफीलिंग करत असलेले इसमांना ताब्यात घेवुन, त्यांना त्यांचे नांव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नांव 1) सचिन आबा बोधले वय- 31 वर्षे रा. दहिवडी, ता. तुळजापुर जि. धाराशीव, 2) माणिक बालाजी गुट्टे वय- 32 वर्षे रा. दैठणे ता. परळी जि. बीड, 3) उल्हास जिवन कवडे वय- 32 वर्षे रा. कन्हेरवाडी ता.कळंब जि.धाराशीव, 4) अमृत बाळासाहेब ठोकळ वय- 33 वर्षे रा. कामरगांव ता.जि. अहिल्यानगर, असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना ते रिफिलींग करित असलेल्या कामाबाबत परवाना आहे काय ? याबाबत विचारपुस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाना नसल्याचे सांगुन, स्वतःचे आर्थिक फायद्या करीता 03 एच.पी गॅस टॅकर मधुन जुगाड करुन व्यवसायीक गॅस टाक्यमामध्ये भरत असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करुन 1)30,48,528 /-रुपये कि.चे एच.पी. कंपनीचा गॅस 57.200 टन गॅस, 2) 1,65,00,00/- रुपये कि.चे 03 एच.पी. गॅस टॅकर, 3) 60,000/- रुपये किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 02 भरलेले व 18 रिकाम्या गॅस टाक्या, 4) 5,00,000/- रुपये किंमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ,5) 100/- रुपये किमतीचा एक लोखंडी पाना, 6) 1000/-रु कि.चा गॅस भरण्यासाठी वापले जाणारे पाईप असलेले नौजल व 03 पांढरे रगांचे प्लॅस्टीकचे तोडलेले सिल असा एकुण 2,01,09,628/- रुपये किंमतीची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, बेकायदेशिर रित्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता एच.पी. कंपनीच्या 03 गॅस टॅकर मधुन भारत गॅस कंपनीच्या व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफिलींग करतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास

धोका होईल,अशा धोकादायक पध्दतीने रिफिलींग करतांना मिळुन आलेले आहे.
ताब्यातील आरोपी विरुध्द अहिल्यानगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. 239 /2026 भारतीय न्याय संहिता कलम 287, 288, सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चेकलम 3, 7, सह एल पी जी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चेकलम 3(2)(b) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम 43, 45, 46, सह स्फोटके अधिनियम 1884 चेकलम 9(b) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles