राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, तब्बल ९० प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, धक्कादायक कारण आले समोर

बुलढाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या ९० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेत सामूहिक राजीनामे दिले. ॲड. नाझेर काझी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज सायंकाळी मोठा राजकीय पेच निर्माण झाला. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मकरंद पाटील बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सायंकाळी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच ९० हून अधिक बड्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपले राजीनामे सादर केले. या सामूहिक राजीनाम्यांमुळे नियोजित बैठक रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर ओढवली आहे.

आजही बुलढाणा जिल्ह्यातील आणखी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीत नाझेर काझी यांना डावल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आणखी काही राजीनामे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनेत्रा पवार ही नाराजी कशी रोखणार? याकडे आता कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles