Apple iPhone 16e ला भारतात 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. . क्रोमा सध्या Apple iPhone 16e वर शानदार डिस्काउंट देत आहे. ज्यामध्ये खरेदीदारांना 11,500 रुपयांपेक्षा जास्त बचत मिळू शकते. सध्या Croma च्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन 52,390 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच थेट 7,510 रुपयांपर्यंत फ्लॅट सूट मिळत आहे.
याव्यतिरिक्त, तुम्ही Axis Bank किंवा ICICI Bank च्या क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. याचा अर्थ iPhone 16e वर एकूण 11,500 रुपयांपेक्षा जास्त बचत होईल.
Apple iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले दैनंदिन वापरासाठी, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियासाठी चांगला अनुभव देतो. परफॉर्मेंसच्या बाबतीत, iPhone 16e मध्ये Apple च्या लेटेस्ट A18 चिपसेटचा वापर केला जातो.
फोनमध्ये अनेक AI-पॉवर्ड फीचर्स मिळतात. जसे की, इमेज क्लीनअप, इमेज प्लॅग्राउंड, ChatGPT इंटीग्रेशन आणि AI Writing Tools, यो यूझर एक्सपीरियन्सला बेस्ट बनवते. कॅमेऱ्यांसाठी, यात 2x ऑप्टिकल झूमसह 48MPचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MPचा फ्रंट कॅमेरा आहे.


