Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट ४५०० रुपये जमा

Ladki Bahin Yojana ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा ४५०० रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मदत दिली जाते

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्यानं अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. काही पैसे जमा न झाल्याने महिलांनी थेट संबंधितांकडे जात आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला होता, नाराज झालेल्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले नव्हते. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या.

या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम व अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा स्थितीत लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles