भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची ED कडून सखोल चौकशी सुरू करण्यात येत आहे. पुणे, नागपूरसह नाशिकमध्ये ११ ठिकाणी ईडीनं छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचे कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. SIT अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे.
भोंदू अशोक खरात याच्या घरीही आयकर विभागाने छापेमारी केली. भोंदू अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मालमत्तांसंदर्भात आयकर विभागाकडून तपास सुरू आहे. नाशिकच्या तृप्ताबाला या बंगल्यात गेल्या तासाभरापासून आयकर विभागाचे दोन पथके तपास करत आहेत. आयकर विभाग आणि ईडीकडून संयुक्त रित्या कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दुसरीकडे अशोक खरात याला तिसऱ्यांदा 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अशोक खरात याला २० एप्रिलपर्यांत न्यायालयीन कोठडी दिली आहे


